शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बसथांब्यावर सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

By नारायण बडगुजर | Updated: January 22, 2026 19:43 IST

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : तीन गुन्हे उघडकीस, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

पिंपरी : बसथांब्यांवर वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या एका तासात जेरबंद केले. यात सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी असे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल बसथांब्यांवर महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी तसेच घरफोडीच्या घटनाही घडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखा युनिट एकने दोन स्वतंत्र पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, निगडी बसथांबा परिसरात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करून पळणाऱ्या तीन महिलांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाखांचे मंगळसूत्र व गंठण हस्तगत केले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.  

दरम्यान, याचवेळी दिघी परिसरात घरफोडी करणाऱ्या एका संशयितासह चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली. त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून दिघी पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे उघड करण्यात आले. तिसऱ्या कारवाईत, दुचाकी चोरी करणाऱ्या विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील दीड लाख रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी उपनिरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक उपनिरिक्षक सूर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दीपक तांदळे, केशव चेपटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Interstate chain-snatching gang arrested near bus stop; ₹5 lakh recovered.

Web Summary : An interstate gang targeting elderly women at bus stops was arrested in Pimpri-Chinchwad within an hour. Police recovered ₹5 lakh worth of stolen jewelry and vehicles, solving multiple theft and burglary cases.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र