शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भाजप महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; भाजप ‘युमो’चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:35 IST

याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पिंपरी: भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी गुरुवारी (दि ३०) पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला आहे.अनुप मोरे यांनी राजीनामा पत्र दिले आहे. मोरे म्हणाले, गेले काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जातात. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते. माझे आई वडील माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भाजपाचे काम प्रामाणिकपणे अविरत करत आहे. बुध अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष पर्यंत पोहोचण्यासाठी पार्टीने माझ्यावर विश्वास टाकला.माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये,  म्हणून मी राजीनामा देत आहे.'

नेमकं काय आहे प्रकरणयाप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला भाजपाची पदाधिकारी आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे व जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या होत्या. दरम्यान, बंगल्याबाहेर संशयितांनी आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू येथे का आलीस? तुला मारून टाकू. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे. तुला बदनाम करून जगणे मुश्किल करू. अनुप मोरे हा आमचा बाप आहे, तो आम्हाला सांभाळून घेईल, असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी महिला पुन्हा बंगल्यात परत गेली.त्यावेळी एक व्यक्ती कार घेऊन फिर्यादी महिलेला सोडायला आला असता, अनेक महिलांनी फिर्यादी महिलेच्या गाडीला घेराव घातला. फिर्यादी महिला तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलिस ठाण्यात गेली असता, अनिता तिपाले व एकविरा खान यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. तक्रार नोंदवून पोलिस ठाण्याच्या बाहेर येताच फिर्यादी महिलेला पुन्हा शंभर जणांच्या टोळक्याने धमकी दिली. तुला मारून टाकू असे त्यांनी धमकावले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील तपास करत आहेत.पोलिस म्हणतात.. अनावधानाने राहिले नावपीडित महिलेने फिर्याद देताना जबाबात आठ जणांची नावे नमूद केली. त्यातील सात जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुप मोरे याचा आरोपींच्या नावामध्ये समावेश का केला नाही, अशी विचारणा फिर्यादी महिलेने केली. त्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश केला. अनावधानाने अनुप मोरे याचे नाव राहून गेले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader Assaulted; BJP Youth Wing President Anup More Resigns

Web Summary : Following assault allegations, BJP leader Anup More resigned as Yuva Morcha president. A female BJP official was threatened in Chinchwad, prompting a police complaint against More and others for alleged intimidation and assault. More denies the charges, citing a smear campaign.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी