शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत कमांडोनी घेतला आयटी कंपनीवर ताबा; हेलिकॉप्टर उतरलं; काय आहे यामागचं कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:15 IST

- दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं.

पुणे -  हिंजवडी आयटी पार्कमधील एका अग्रगण्य आयटी कंपनीत आज राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) कमांडोंनी दहशतवादविरोधी मॉक ड्रिल पार पाडलं. या विशेष सुरक्षा कवायतीदरम्यान एनएसजीच्या हेलिकॉप्टरचा वापर करत जीवंत आणि थरारक बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या प्रकारच्या उच्चस्तरीय कवायतीमुळे परिसरात नागरिकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं आहे.या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं. आयटी कंपनीवर हल्ला झाल्याची कल्पित परिस्थिती उभारून कमांडोंनी आत शिरून सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि बंदीस्त भागातून कर्मचाऱ्यांची सुटका कशी केली जाते, याचं वास्तवदर्शी चित्र उभं केलं. दरम्यान, कंपनीच्या आवारात फक्त एनएसजीचं विशेष प्रशिक्षित पथक कार्यरत होतं, तर परिसरात स्थानिक पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. कुणालाही या परिसरात प्रवेश देण्यात आलेला नाही. संपूर्ण ऑपरेशन अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने राबवण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे आणि कमांडोंच्या हालचालींमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये उत्सुकता वाढली. अनेकांनी या दृश्यांचे मोबाईलवर चित्रीकरण करत सोशल मीडियावर पोस्ट केलं. मात्र, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आणि मॉक ड्रिलला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.प्रशासन सतर्क, संभाव्य संकटासाठी तयारीया प्रकारच्या मॉक ड्रिलमुळे आयटी हबमध्ये दहशतवादविरोधी सज्जता कशी असावी, याचं उदाहरण पाहायला मिळालं. अशा कवायतीमुळे सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता वाढतेच, शिवाय नागरिकांमध्येही आपत्कालीन परिस्थितीबाबत जागरूकता निर्माण होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीhinjawadiहिंजवडी