- रवींद्र जगधनेपिंपरी :पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच मंडळ अधिकारी कार्यालयांपैकी दोनच कार्यालये शासकीय जागेवर आहेत. तर ३१ तलाठी (सजा) कार्यालयांपैकी पिंपळे वाघेरे व किवळे ही दोनच कार्यालये शासकीय जागेत आहेत. तर ३१ सजांचे कामकाज ११ कार्यालयांतून चालते. २० सजांना सध्या कार्यालय नाही. त्यामुळे त्यांचे कामकाज इतर कार्यालयांतून चालते. एका सजामध्ये दोन ते सहा तलाठ्यांचे दफ्तर आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत अगोदर भोसरी व चिंचवड ही दोनच मंडळ व नऊ तलाठी कार्यालये होती. मात्र, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने निगडी, देहू व मोशी अशी तीन मंडळ अधिकारी कार्यालये आणि २२ तलाठी कार्यालयांची निर्मिती केली. मात्र, अगोदर या कार्यालयांसाठी तलाठी नव्हते. नवीन तलाठी भरतीमध्ये देहू येथील विठ्ठलनगर तलाठी कार्यालय वगळता २१ तलाठी मिळाले आहेत. मात्र, त्यांना बसण्यासाठी कार्यालयच नसल्याने तहसील कार्यालयाकडून कार्यालयांसाठी जागांची शोधाशोध सुरू आहे. अकरापैकी नऊ तलाठी कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून सुरू आहे. नागरिकांची होतेय गैरसोयरहाटणी, देहू व भोसरी सजात तीन तलाठी, चऱ्होली सजात चार तलाठी व किवळे सजात सहा तलाठी बसत असल्याने जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे तलाठी व कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही, त्यामुळे नागरिकांना उभे राहण्यासही जागा नसते. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.मूळ सजा कार्यालय - कार्यालय उपलब्ध नसलेल्या सुरू सजाचिंचवड - आकुर्डीरहाटणी - पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरकिवळे - निगडी, किन्हई, चिंचोली, रावेत, मामुर्डीदेहू - माळीनगर, विठ्ठलनगरचिखली - तळवडेभोसरी १ - भोसरी २, दापोडीसांगवी - पिंपळे निलखदिघी - बोपखेलमोशी - डुडूळगाव, बोऱ्हाडेवाडीचऱ्होली - निरगुडी, चोविसावाडी, वडमुखवाडी
तीस सजांसाठी तलाठी शासनाकडून मिळाले आहेत. मात्र, काही सजांना कार्यालये उपलब्ध झालेली नाहीत. सात सजांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. - जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड