शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी

By नारायण बडगुजर | Updated: February 11, 2026 20:10 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड अपघातात एकाचा होतोय मृत्यू : वाहतूक नियम कागदावर; भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक, अवजड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव आणि नियमांच्या उल्लंघनाचा परिणाम 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या औद्योगिक आणि महामार्गालगतच्या परिसरात अपघातांचे सत्र सुरू आहे. यात दुचाकीस्वार, पादचारी, महिला, वृद्ध व चिमुकल्यांना जीव गमवावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे चिरडले जाऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यांना जीव गमवावा लागत आहे. अपघातांमुळे शहरातील रस्ते रक्ताने माखले असून, त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढत आहे. बहुतेक अपघातांमध्ये भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक, अवजड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही प्रमुख कारणे समोर येत आहेत. अपघातानंतर चालकांवर गुन्हे दाखल होत असले, तरी अपघात रोखण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाय होत नाहीत.

--------------------

तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक अपघात

नोव्हेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या सव्वातीन महिन्यांच्या कालावधीत ५० पेक्षा जास्त प्राणांतिक अपघात झाले. यात ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दिवसाआड एकाचा मृत्यू होत असल्याचे यावरून समोर आले आहे. हे अपघातसत्र आणि मृत्यूची मालिका कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------------

अपघातांमुळे ‘हॉटस्पॉट’ ठरताहेत ‘हे’ भाग

चिखली-कुदळवाडी-डायमंड चौक.

काळेवाडी फाटा-रहाटणी फाटा-बीआरटी मार्ग.

वाकड-मानकर चौक-कस्पटे वस्ती रस्ता.

थरमॅक्स चौक-निगडी रस्ता.

हिंजवडी-पुनावळे-ताथवडे.

तळवडे ते त्रिवेणीनगर चौक रस्ता.

तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर रस्ता.

सोमाटणे फाटा-तळेगाव दाभाडे (पुणे-मुंबई जुना महामार्ग).

स्पाईन रोड-मोशी-भोसरी एमआयडीसी.

---------------------

बंदी असूनही अवजड वाहनांची घुसखोरी

शहरातील हाॅटस्पाॅट ठरत असलेल्या, तसेच गर्दी व वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. असे असतानाही बंदी असलेल्या मार्गांवरून, तसेच गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात कंटेनर, ट्रेलर, हायवा, डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रक यांसारखी जड वाहने बेदरकारपणे दामटली जातात.

------------------

अपघातांचे काही ठळक दाखले

७ फेब्रुवारी २०२६

चिखली येथील डायमंड चौकात जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. तरुणी वैष्णवी दिघे (२२) यांचा जागीच मृत्यू; दुसरी महिला गंभीर जखमी.

१ फेब्रुवारी २०२६

सोमाटणे फाटा येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार बाबासाहेब जाधव (५३) यांचा मृत्यू.

१४ जानेवारी २०२६

काळेवाडीतील रहाटणी फाट्यावर मकर संक्रांतीस ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणी ऋतुजा (२४) व नेहा शिंदे (२०) यांचा मृत्यू.

१३ जानेवारी २०२६

निगडी थरमॅक्स चौकात ट्रेलरच्या धडकेत आशा लोखंडे (३१) यांचा मृत्यू.

१७ जानेवारी २०२६

काळेवाडी फाटा-कस्पटे वस्ती रस्त्यावर लक्झरी बसच्या धडकेत अविनाश गायकवाड (२५) यांचा जागीच मृत्यू.

१ डिसेंबर २०२५

हिंजवडी येथे भरधाव बसने दोन बहिणी व लहान भावाला चिरडले; तिघांचा मृत्यू.

-----------------------------

‘लोकमत’चे प्रश्न

प्रवेशबंदी असतानाही जड वाहने शहरात येतात कशी?

वारंवार अपघातांचे रस्ते, चौकांबाबत कायमस्वरूपी उपाय कधी?

अपघातप्रवण ठिकाणांचे नियमित ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट होते का?

वाहतूक पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ई-चालान व्यवस्था प्रत्यक्षात प्रभावी कधी होणार?

अवजड वाहनचालकांवर केवळ गुन्हे दाखल करून विषय संपतो का? त्यांच्या परवान्यांवर कारवाई कधी होणार?

रस्त्यांची रचना, अपुरी प्रकाशयोजना, खराब सिग्नल यासाठी जबाबदार कोण?

अपघातातील मृतांच्या कुटुंबांना मदत, दीर्घकालीन सुरक्षिततेची हमी कधी मिळणार?

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात