स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By Admin | Updated: January 22, 2016 00:54 IST2016-01-22T00:54:42+5:302016-01-22T00:54:42+5:30

स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्मार्ट सिटीत रोजगार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. आपले शहर याबाबतीत कुठेही मागे नाही

People's participation is important for Smart City | स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

पिंपरी : स्मार्ट सिटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्मार्ट सिटीत रोजगार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. आपले शहर याबाबतीत कुठेही मागे नाही. मात्र, पवना नदीतील प्रदूषण पाहता यात मागे आहोत. त्याबरोबरच प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर होणे गरजेचे आहे, जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी होईल, असे विचार उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.
चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने आयोजित १९व्या शिशिर व्याख्यानमालेचा दुसरा दिवस गुरुवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. रोटरी क्लबचे अध्यक्ष संजीव दाते यांच्या हस्ते सत्कार झाला. उद्योजक प्रेमचंद मित्तल यांना वोकेशनल एक्स्लन्स अ‍ॅवॉर्ड फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, योगेश बहल, अभय टिळक आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: People's participation is important for Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.