PCMC: होर्डिंग्जमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मालकच जबाबदार, कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

By विश्वास मोरे | Published: April 16, 2024 07:19 PM2024-04-16T19:19:57+5:302024-04-16T19:20:25+5:30

वादळवाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत....

PCMC: Owners responsible for hoardings, warning of action pune latest news | PCMC: होर्डिंग्जमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मालकच जबाबदार, कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

PCMC: होर्डिंग्जमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मालकच जबाबदार, कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

पिंपरी : महापालिका हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व जाहिरात फलकधारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चर मजबूत आहे, याची खातर जमा करावी, जर स्ट्रक्चर कमकुवत असेल तर ते त्वरित हटवावे, येत्या काही दिवसांत वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास जाहिरात फलकधारकास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

वादळवाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त संदीप खोत आदी उपस्थित होते.

स्ट्रक्चर स्टॅबिलिटी एप्रिलअखेरपर्यंत तपासा...

महापालिका हद्दीतील काही जाहिरात फलक हे महापालिका परवानगीकरिता प्रलंबित आहेत. ही बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच सर्व जाहिरात फलकांची सादर केलेली स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पुन्हा २०२४-२५ एप्रिलअखेरपर्यंत तपासून घेण्याबाबत सूचना सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिल्या आहेत.

स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक असणार आहे. जाहिरात फलकांना ज्या संरचना अभियंत्याने प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किंवा फलक पडून काही जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित संरचना अभियंत्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.

- संदीप खोत, उपायुक्त, महापालिका

Web Title: PCMC: Owners responsible for hoardings, warning of action pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.