शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PCMC: ४१ हजार जणांना नोटिसा, ४ दिवसांत ६८ प्रॉपर्टी जप्त; मालमत्ता कर थकवल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 09:41 IST

मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने केले आहे...

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. ६८ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या. त्यामुळे आता मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहेत. मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी त्वरित कराचा भरणा करावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख ७ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. पहिल्या सहामाहीत ५८५ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १ ऑक्टोबरपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू झाले आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू आहे.

आत्तापर्यंत कर संकलन विभागाने ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटिसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ताधारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ताधारकांकडे तब्बल ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या सुरुवातीला बिगरनिवासी व मोकळी जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

जप्ती मोहीम सुरू

महापालिकेतर्फे ३ ऑक्टोबरपासून जप्ती माेहीम सुरू करण्यात आली असून, दोन हजार १८४ मालमत्ताधारकांना जप्ती अधिपत्र दिली आहेत. यापैकी १ हजार ९४८ मालमत्ता जप्ती अंमलबजावणीसाठी पात्र आहेत. यामध्ये ६८ मालमत्तांची जप्ती करण्यात आली. जप्ती करताच ६२ जणांनी तत्काळ ८७ लाख ३७ हजार रुपये रोख अथवा धनादेश जमा केले, तर सहा मालमत्ता या सील करण्यात आल्या आहेत.

जप्ती मोहिमेसाठी विविध उपक्रम राबविणार

१) यू-ट्यूबवर टार्गेट ऑडियन्स पाहून त्या त्या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणार

२) रिक्षावरती जिंगलद्वारे प्रबोधन करणार असून, रिक्षावरती छोटे पोस्टर जे ठळक अक्षरामध्ये असतील की जप्तीची मोहिमेची माहिती देणार.

कर संकलन विभागाचे आता व्हाॅट्सॲप चॅनल

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या विविध सवलत योजना, माहिती यासह जनजागृती, थकबाकीदारांची माहितीही या व्हाॅट्सॲप चॅनलवरून प्रसारित करण्यात येणार आहे. जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

- नीलेश देशमुख (सहाय्यक आयुक्त)

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी