पिंपरी : महापालिकेच्या उपमहापौर पदावर भाजपच्या शर्मिला राजेंद्र बाबर यांची बिनविरोध निवड झाली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि मोठा जनसंपर्क असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. निगडी-आकुर्डी प्राधिकरणातील सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची पावती त्यांना शहराच्या उपमहापौर पदातून मिळाली आहे.
शर्मिला बाबर एम.ए. (इतिहास) असून, नगरसेविका म्हणून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. पहिल्यांदा त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात निगडी-आकुर्डी प्राधिकरणातून नगरसेविका म्हणून प्रभावी काम केले. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये त्यांची उपस्थिती शंभर टक्के राहिली असून, विविध निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी शिक्षण समितीच्या उपसभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून, २०१९ ते २०२१ या काळात सलग दोन वर्षे त्यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्या अग्रेसर राहिल्या आहेत. या प्रवासात त्यांचे पती आणि भाजपचे मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर यांची त्यांना साथ मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ‘मन की बात’ आणि ‘चाय पे चर्चा’ यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. पक्षाप्रति निष्ठा आणि कौटुंबिक साथ त्यांना या पदापर्यंत पोहोचविले आहे.
किकली ते पिंपरी-चिंचवड
शर्मिला बाबर यांचे सासर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली असून, पती राजेंद्र बाबर कामानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दिवगंत खासदार गजानन बाबर यांच्यासोबत सामाजिक व राजकीय जीवनात प्रवेश केला. शर्मिला बाबर पहिल्यांदा २०१७ मध्ये भाजपकडून प्रभाग क्रमांक १५ निगडी-आकुर्डी परिसरातून विजयी झाल्या. आताच्या निवडणुकीत प्रभाग १५ मधील भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
Web Summary : Sharmila Babar, highly educated and experienced, was elected unopposed as Pimpri-Chinchwad's Deputy Mayor. Her social work in Nigdi-Akurdi and dedication to BJP initiatives earned her the position. Her hundred percent attendance in meetings and active participation made her a valuable asset.
Web Summary : शर्मीला बाबर, उच्च शिक्षित और अनुभवी, पिंपरी-चिंचवड की उपमहापौर निर्विरोध चुनी गईं। निगडी-आकुर्दी में उनके सामाजिक कार्यों और बीजेपी की पहल के प्रति समर्पण ने उन्हें यह पद दिलाया। बैठकों में उनकी शत-प्रतिशत उपस्थिति और सक्रिय भागीदारी ने उन्हें बहुमूल्य बनाया।