शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

PCMC: हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त! महापालिकेकडून कारवाईसाठी सोळा पथके तैनात

By विश्वास मोरे | Updated: November 8, 2023 11:59 IST

उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले आहेत...

पिंपरी : हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले आहेत. 

पिंपरी- चिंचवड महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमध्ये शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच मार्गदर्शक सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. महापालिकेने नव्याने लागू केलेल्या उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या पथकांमध्ये उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि एमएसएफ कर्मचारी यांचा समावेश आहे.

जबाबदारी केली निश्चित!

वायू प्रदूषण नियंत्रण पथकाचे प्राथमिक कर्तव्य त्यांच्या संबंधित प्रभागातील बांधकाम स्थळांना भेट देणे, फोटो किंवा व्हिडिओग्राफीद्वारे त्याची नोंद घेणे, यादरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास  दंड आकारणे, नोटिस जारी करणे किंवा कामाची जागा सील करून दंडात्मक कारवाई करणे हे असणार आहे. नोटीस बजावलेल्यांची संख्या, वसूल केलेला दंड आणि दररोज होणाऱ्या कारवाईची या पथकांद्वारे नोंद ठेवण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ नुसार नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

बांधकाम विकसकांनाही केल्या सूचना

महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या बाजूने हिरवे कापड तसेच ज्यूट शीट ताडपत्रीने कव्हर करणे बंधनकारक असणार आहे. बांधकाम पाडताना त्यावर सलग पाणी फवारणे शिंपडणे तसेच काम सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य लोडींग अनलोडींग दरम्यान पाणी फवारले जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच या उपाययोजनांसाठी जवळच्या महापालिका सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करावा. शिवाय, शहरातील बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सेन्सरवर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स बसविणे आणि बांधकाम कर्मचार्‍यांसाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरणे यावरही भर दिला जाणार आहे.

आयुक्त शेखर सिंह  म्हणाले, घनकचऱ्यासह इतर कोणत्याही प्रकारचा कचरा उघड्यावर जाळण्यास सक्त मनाई असून नागरिक स्मार्ट सारथी अॅपमध्ये दिलेल्या पोस्ट अ वेस्ट या सुविधेद्वारे अशा घटनांची तक्रार करू शकतात. विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड आणि संभाव्य कचरा जाळण्याच्या ठिकाणीही उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन.जी.टी) निर्देशांनुसार तसेच सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या (१२ नोव्हेंबर २०२२ रोजीचा आदेश) निर्देशांनुसार फटाके वाजविण्यासही फक्त रात्री ७ ते १० दरम्यान परवानगी देण्यात आलेली आहे. वाहतूक विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना वाहन उत्सर्जन नियमांची अंमलबजावणी करणे, वैध प्रदूषण नियंत्रण (पीयुसी) प्रमाणपत्र सुनिश्चित करणे आणि वाहनांच्या ओव्हरलोडिंगचे निरीक्षण करणे बंधनकारक असणार आहे.

शहरातील ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्यतो टाळावे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. या सर्व निर्देशांची अंमलबजावणी विविध पर्यावरणीय कायदे आणि नियम लक्षात घेऊनच करण्यात आली असून याचा उद्देश हवेची गुणवत्ता वाढवणे आणि शहराच्या एकूण पर्यावरणीय कल्याणासाठी आहे.

शहरातील हवा प्रदुषण रोखण्यासाठी

  • ३२ प्रभागात १६ पथके तैनात
  • निर्देशांचे पालन न केल्यास कठोर कारवाई
  • उंच बांधकाम इमारतीसाठी ३५ फूट टिन/मेटल शीट अनिवार्य
  •  बांधकामाच्या ठिकाणी हिरवे कापड आणि ताडपत्रीचा वापर
  • बांधकामाच्या दरम्यान पाणी शिंपडणे
  • उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी
  • स्मार्ट सारथी अॅपद्वारे नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई
  • फटाके वाजविण्यावर मर्यादित वेळ
  • वाहनांची पीयुसी प्रमाणपत्र पडताळणी
  • ईव्ही बसेसची संख्या वाढविण्यावर भर
  •  डिजेल जनरेटर वापरावर नियंत्रण
  • दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिका