पिंपरी : महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागांसह एकहाती वर्चस्व गाजवले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला फारसे यश मिळाले नाही. २०१७ मध्ये एकत्रित शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या होत्या; पण आता शिंदेसेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले.
शिंदेसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या उमेदवारांपैकी प्रभाग १६ मध्ये ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नीलेश तरस; प्रभाग २४ मध्ये विश्वजित बारणे, नीलेश बारणे आणि प्रभाग १३ मध्ये सुलभा उबाळे यांनी विजय मिळवला.
पराभवाची मुख्य कारणे
शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची उद्धवसेना आणि शिंदेसेनेत विभागणी झाली. शहरातील मराठी आणि कामगार वर्गात भाजपच्या विकासकामांचा प्रभाव जास्त राहिला, तर शिंदेसेनेची प्रचार यंत्रणा कमकुवत ठरली. एकूण ५६ उमेदवार रिंगणात उतरले; पण बहुतेक ठिकाणी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. स्थानिक स्तरावर संघटनात्मक बांधणी नसल्याचाही फटका शिंदेसेनेला बसला.
संपूर्ण पॅनेल जिंकण्यात अपयश
शिंदेसेनेला संपूर्ण पॅनेल कोणत्याच प्रभागात निवडून आणता आले नाही. खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रभाव असलेल्या (प्रभाग २३ व २४) बालेकिल्ल्यातही पूर्ण पॅनेल करता आले नाही. त्यांचा मुलगा विश्वजित बारणे ३,७११ मतांनी, तर पुतण्या नीलेश बारणे ७,९९० मतांनी निवडून आले. बारणेंनी प्रचारात सक्रिय भाग घेतला; पण भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार)च्या उमेदवारांनी शिंदेसेनेच्या उमेदवारांना मात दिली. अंतर्गत फूट आणि मतदारांपुढील पर्याय यामुळे पक्षाला फटका बसला.
आयत्या वेळच्या उमेदवारांचा शून्य फायदा
इतर पक्षांतील अनेक बंडखोरांना शिंदेसेनेने आयत्या वेळी उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा फायदा झाला नाही. ही निवडणूक शिंदेसेनेसाठी आत्मपरीक्षणाची ठरली आहे. भाजपच्या वर्चस्वात सहयोगी म्हणून राहूनही स्वतंत्र ओळख टिकवणे आव्हानात्मक ठरले.
Web Summary : In PCMC elections, BJP dominated with 84 seats. Shinde's Sena secured only six seats, a decline from nine in 2017. Internal divisions, a weak campaign, and BJP's influence contributed to Shinde Sena's poor performance and failure to win complete panels.
Web Summary : पीसीएमसी चुनावों में भाजपा 84 सीटों के साथ हावी रही। शिंदे सेना को केवल छह सीटें मिलीं, जो 2017 में नौ से कम है। आंतरिक विभाजन, कमजोर अभियान और भाजपा के प्रभाव ने शिंदे सेना के खराब प्रदर्शन और पूर्ण पैनल जीतने में विफलता में योगदान दिया।