शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मॅजिक फिगर पार; भाजप ६५, राष्ट्रवादी ३१ जागा, सत्ता येण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:32 IST

PCMC Election Results 2026 भाजप तब्बल ६५ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी ३१ तर शिवसेना ५ जागांवर आघाडीवर आहे

पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपने दमदार कामगिरी करत मॅजिक फिगर गाठली आहे. भाजप तब्बल ६५ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी ३१ तर शिवसेना ५ जागांवर आघाडीवर आहे. शहराच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत अनेक प्रभागांत भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली. काही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत असली तरी बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपने सुरक्षित आघाडी निर्माण केली आहे. यामुळे महापालिकेतील सत्ता पुन्हा भाजपकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

दुसरीकडे राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. काही जागांवर त्यांनी लढत टिकवून ठेवली असली तरी एकूण चित्र भाजपच्या बाजूने झुकलेले आहे. निकाल अधिकृत झाल्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून शहरभर विजयाचे फटाके आणि अभिनंदनाचे बॅनर झळकत आहेत. अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार लढत आहेत. यंदा भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीतच मुख्य सामना होणार असून, भाजपने दोन जागा बिनविरोध करून खाते खोलले आहे. शहरात महायुती तुटली असून आणि महाविकास आघाडीही फुटली आहे. मागील सत्ताधारी भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुती असताना पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेना स्वबळावर उतरले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Majority in PCMC 2026 Elections; NCP Trails.

Web Summary : BJP achieved a majority in PCMC elections with 65 seats, while NCP secured 31. Celebrations erupt as BJP is likely to retain power. The election saw a split between Mahayuti and Mahavikas Aghadi.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस