पिंपरी : महापालिकेत एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने यंदा १२८ जागांपैकी केवळ ५८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पक्षाला एकूण ३२ पैकी सहा प्रभागांमध्ये एकही उमेदवार देता आलेला नाही, तर केवळ चार प्रभागांमध्ये पूर्ण पॅनेल उभे करता आले आहे.
काँग्रेस ‘एकला चलोरे’ म्हणत स्वबळ अजमावत आहे. २०१७ मधील निवडणुकीत पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नव्हती. यंदाच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात अंतर्गत वाद झाले. यातून कैलास कदम यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यापासून ते एबी फाॅर्म वाटप करण्यापर्यंत मोठी कसरत करावी लागली. पक्षातील गोंधळ पाहून इच्छुकांनी पक्षाकडे पाठ फिरवली. परिणामी ३२ प्रभागांमधील १२८ जागांसाठी उमेदवार मिळाले नाहीत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारांची शोधाशोध सुरू होती. यात केवळ ५८ जागांसाठी उमेदवार मिळाले.
केवळ चार प्रभागांमध्ये पॅनेल
काँग्रेसतर्फे १, २, ३, ४, ५, ६, १४, १८, २८, ३१ आणि ३२ या प्रभागांमधून प्रत्येकी केवळ एक, प्रभाग १० आणि २३ मधून प्रत्येकी दोन, प्रभाग ८, १२, १३, १५, १९, २०, २२, २५ आणि ३० या नऊ प्रभागांमधून प्रत्येकी तीन, तर प्रभाग ९, ११, १६ आणि १७ या चार प्रभागांमधून प्रत्येकी चार असे उमेदवार उभे आहेत.
या प्रभागांत उमेदवार नाही
शहरातील ७, १८, २१, २४, २६ आणि २९ या सहा प्रभागांमध्ये एकही उमेदवार पक्षाला मिळाला नाही. १२८ पैकी निम्म्या जागांवरही उमेदवार देता आलेले नाहीत.
गोंधळाला कंटाळून उमेदवारी मागे
काँग्रेसला उमेदवारांची शोधाशोध करावी लागत असतानाच समन्वयाअभावी मोठा गोंधळ उडाला. चार ते पाच जागांसाठी दोन-दोन ‘एबी फाॅर्म’ देण्यात आले. यातून उमेदवारांनी समन्वय समितीवर आगपाखड केली. या गोंधळाला कंटाळून काहींनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी मागे घेतली. निष्ठावंतांना डावलण्यासाठी दोन ‘एबी फाॅर्म’ देण्यात आल्याचाही आरोप झाला.
Web Summary : Pimpri-Chinchwad Congress faces challenges, fielding candidates in just 58 of 128 seats. Internal conflicts and candidate withdrawals plague the party, leaving six wards without representation and only four with full panels.
Web Summary : पिंपरी-चिंचवड कांग्रेस को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है, 128 में से केवल 58 सीटों पर उम्मीदवार मैदान में हैं। आंतरिक कलह और उम्मीदवारों की वापसी से पार्टी त्रस्त है, जिससे छह वार्डों में कोई प्रतिनिधित्व नहीं है और केवल चार में पूर्ण पैनल हैं।