पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी; शहरात १ जुलैपासून 'पे अँड पार्क' योजना; ४५० ठिकाणी पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 20:40 IST2021-06-29T20:39:33+5:302021-06-29T20:40:56+5:30
पिंपरी महापलिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी; शहरात १ जुलैपासून 'पे अँड पार्क' योजना; ४५० ठिकाणी पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक १ जुलैपासून शहरात पे अँड पार्क योजना करण्यात येत आहे. यात १३ मुख्य रस्ते आणि दहा उड्डाणपुलाखालील जागांचा समावेश आहे. त्यामध्ये एकुण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत.
महापलिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त आणि त्यासंबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकीत १ जुलैपासुन शहरात पे अँड पार्क योजनेचे सुरवात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करणेसाठी मे. निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---
पार्किंग ठिकाणांची नावे
रस्त्यांवरील (ऑन स्ट्रीट पार्किंग) नावे
टेल्को रोड - ५६
स्पाईन रोड- ५५
नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता- ४१
जुना मुंबई पुणे रस्ता - ५८
एम. डी.आर. ३१ - ३९
काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता - ३६
औंध रावेत रस्ता- १६
निगडी वाल्हेकरवाडी रस्ता -२९
टिळक चौक ते बिग इंडीया चौक -८
प्रसुनधाम सोसायटी रोड- ११
थेरगाव गावठाण रोड- १.
नाशिक फाटा ते मोशी रोड - २.
वाल्हेकरवाडी रोड- १५
--
उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग
राँयल ग्लोरी सोसायटी वाकड
रहाटणी स्पॉट १८ मॉल
अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी
रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड
भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी
एम्पायर ईस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड
चाफेकर चौक ब्लॉक १ चिंचवड
चाफेकर चौक ब्लॉक २ चिंचवड
पिंपळे सौदागर वाहनतळ
मधुकर पवळे उड्डाण पुल निगडी