पिंपरी : अनेक वाहनधारक वाहनांसाठी ‘चाॅईस नंबर’ घेतात. या वाहन क्रमांकांमध्ये विशिष्ट बदल करून आई, नाना, भाऊ, दादा, शरद, पवार, राज, बाॅस, डाॅन अशी नावे असलेल्या फॅन्सी नंबरप्लेट वाहनांना लावल्या जातात. मात्र, उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेटमुळे (एचएसआरपी) यापुढे असे बदल करणे शक्य हाेणार नाही. ‘एचएसआरपी’मुळे फॅन्सी नंबरप्लेटला चाप लागणार असल्याने नंबरप्लेटवरून विशिष्ट नावे गायब होणार आहेत.
नवीन तसेच जुन्या वाहनांनाही ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. ती न बसवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून ‘एचएसआरपी’साठी नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, अनेक वाहनधारकांना हौसेला मुरड घालावी लागणार आहे. केवळ ‘चाॅईस नंबर’ घेऊन त्यावर त्यांना समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, विशिष्ट बदल करून नावे तयार होणाऱ्या क्रमांकांना आता कमी मागणी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एचएसआरपी’मुळे वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेटला चाप लागणार आहे. केवळ काही विशिष्ट ‘चाॅईस नंबर’ला मागणी राहणार आहे.
नियम उल्लंघनाला आळा
वाहनाच्या नंबरप्लेटमध्ये बदल करून नियमांचे उल्लंघन केले जाते. गुन्ह्यांमध्येही अशा वाहनांचा वापर होतो. त्यामुळे वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्यात आली. यातून नंबरप्लेटमध्ये बदल करण्याचे प्रकार थांबविण्यास मदत होणार असून, नियम उल्लंघनाला आळा बसणार आहे.
चाॅईस नंबरची क्रेझ
वाहनधारकांमध्ये चाॅईस नंबरचीही क्रेझ आहे. यात ०००१, ०००५, ०००७, ०००९, ००१०, ००११, ११११, १२३४, ०१००, ३३३३, ५५५५, ९९९९, १०००, १००८, ०७८६ अशा काही क्रमांकांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. यात व्हीआयपी नंबरही आहेत.
चाॅईस नंबर बदल केल्यानंतर
4141 दादा
9713 भाऊ7171 नाना
9191 बाबा274 राम
2151 राज4129 दारू
2921 स्वरा2124 शरद
4912 पवार7151 नाज
7211 नशा5117 जानु
5161 डाॅन2116 साठे
2127 भरत3115 आई
4216 मराठे2917 खान
2741 सपा4149 यादव
4749 मोदी8110 BJP
1255 RSS8055 BOSS