पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी(दि.६आॅगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. शंकर पात्रे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्रे यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यावरील उपचारासाठी त्यांना ३ आॅगस्टला वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी सकाळी त्यांनी रुग्णालयातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना बाहेर जाता आले नाही. ते इर्मजन्सी जिन्यातून दुसऱ्या मजल्यावर आले. त्यांनी या मजल्यावरील डक्टमधून उडी मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:09 IST
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केली.
पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट, तपास सुरु