शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातून चिंचवड येथे आलेली महिला प्रवासी बॅग विसरली अन् यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 18:18 IST

दिल्ली येथे इस्त्रायल दुतावासाच्या परिसरात बाॅम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर देशात तसेच राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पिंपरी : विदर्भातून एका बसने आलेली महिला प्रवासी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात महामार्गावर उतरली. घरी जाण्यासाठी रिक्षात बसल्या. मात्र त्यांची बॅग त्या तेथेच विसरल्या आणि मोठा गोंधळ उडाला. एका व्यावसायिकाला ती बॅग बेवारस असल्याचे दिसून आले. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पळापळ सुरू झाली. बाॅम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र बॅगेत कपडे तसेच इतर साहित्य मिळून आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दिल्ली येथे इस्त्रायल दुतावासाच्या परिसरात बाॅम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर देशात तसेच राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बेवारस वस्तू, बॅग, संशयित व्यक्ती याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकही सतर्क झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ असून पोलीस उपायुक्तांकडे त्याची जबाबदारी आहे. चिंचवड येथे सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ पुणे-मुंबई महामार्गालगत एकाच इमारतीत दोन्ही परिमंडळांचे कार्यालय आहे. या इमारतीच्या परिसरात महामार्गावर बेवारस बॅग असल्याचे शनिवारी (दि. ३०) सकाळी नऊच्या सुमारास एका व्यावसायिकाच्या निदर्शनास आले. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पुणे येथील बाॅम्ब शोधक नाशक पथकाला याबाबत कळविले. पथक तत्काळ दाखल झाले. त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे तसेच इतर साहीत्य असल्याचे समोर आले. संशयास्पद काही नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

दरम्यान, सदरची बॅग विसरल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी बॅगचा शोध सुरू केला. चिंचवड येथे महामार्गावर कुटुंबिय आले. त्यावेळी गर्दी दिसून आली. नेमका काय प्रकार आहे, म्हणून पाहिले असता, बॅगची तपासणी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ती बॅग आपलीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगची ओळख पटविली. बॅग आमचीच असल्याचे त्यांनी पोलिसांनाही सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाPoliceपोलिसVidarbhaविदर्भ