शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

‘पॅनसिटी’ आराखडा सुरू, नागरिकांच्या सूचनांचा केला जाणार विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:52 PM

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. त्यामुळे पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून केले जात आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. त्यामुळे पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून केले जात आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील कंपनीची प्राथमिक बैठक झाली असून, पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन केले आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत स्मार्ट सिटी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आॅटो क्लस्टर चिंचवड येथे स्मार्ट सिटी अ‍ॅप्रोच कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, कार्यकारी अभियंता कैलास थोरात, प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, इस्रायलमधील तेल अवीव शिष्टमंडळाचे सदस्य जोहार, डॉ. रावेल, डॉ. राम, तसेच समन्वयक वैभव सराफ आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटीविषयक बैेठकीत योजनेच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. त्यामुळे पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन, स्मार्ट सिटीसाठी केलेल्या कंपनीकडून केले जात आहे. या संदर्भात कंपनीची प्रथमिक बैठक झाली आहे. स्मार्ट सिटी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील नागरिकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे.नागरिकांकडून सूचनांचाअंतर्भाव करून स्मार्ट सिटी योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होऊ शकते. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले.>त्यांनी दिला स्मार्ट सिटीचा मंत्रस्मार्ट सिटी संदर्भातील बैठकीच्या वेळी महापालिकेस भेट दिलेल्या इस्रायली शिष्टमंडळाने ध्वनिचित्रफित दाखविली. स्मार्ट सिटी योजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश केला आहे. या बाबतची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी महापालिका अधिकाºयांना दिली. या वेळी तेल अवीवच्या सदस्यांनी स्मार्ट सिटी योजना कशी यशस्वी केली, याची माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. स्मार्ट सिटीचा मंत्र पिंपरी-चिंचवडकरांना दिला.

रूग्णालयामध्ये आहेमनुष्यबळ अपुरेतातडीक विभागात वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र, सायंकाळी पावणेचार ते साडेचार या दरम्यान येथील केबिन मोकळीच होती. तसेच सीएमओ कार्यालयाबाहेरील फलकांवर सहा डॉक्टर आॅन ड्युटी आहेत, असे लिहिले होते. प्रत्यक्षात मात्र तेथे तीनच डॉक्टर दिसून आले.वॉर्डबॉय, परिचारिकांची कामे करताहेत सफाई कर्मचारी रुग्णालयातील तातडीक सेवा विभागात नवख्या व शिकाऊ डॉक्टरांचा भरणा दिसून आला.वॉर्डात परिचारिका, वॉर्डबॉयची कमतरता आढळून आली. त्यामुळे वॉर्डात तातडीक सेवा विभागात तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर असणे गरजेचे आहे. तसेच साफसफाईसाठी असणा-या कर्मचारीही वॉर्डबॉयची कामे करताना दिसले.इंजेक्शन आणि औषधांसाठी पाठवितात बाहेरील मेडिकलमध्ये महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार करताना डॉक्टरांकडून अडवणूक केली जाते. औषधे उपलब्ध नाहीत, असे कारण दाखविले जाते. औषधे आणि इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर पाठविले जाते. तसेच डॉक्टर आपणाजवळील गोळ्या व औषधांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.‘नॉट फॉर सेल’च्या गोळ्या आणि औषधे रुग्णांच्या माथीतसेच डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांच्या पाकिटावर नॉट फॉर सेल असे लिहिलेले असते. नॉट फॉर सेल असणा-या गोळ्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. फ्री सॅम्पल गोळीसाठी डॉक्टरांनी शंभर रूपयांची मागणी केली. रूग्णालयात होणारी अशा प्रकारची ही लूट रोखण्याची गरज आहे.ओळख असेल, तरच यंत्रणेकडून घेतली जाते दखलवशिला असेल, त्याला कोठेही काहीही सुविधा मिळते. मात्र, वायसीएममध्ये ज्याचा वशिला नसेल, त्याचे खूप अवघड आहे. या रुग्णालयात सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण येत असतात. त्यांच्या जिवाचीही किंमत करायला हवी. अपघाताचे रुग्ण अधिक प्रमाणावर येत असतात. त्यामुळे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची गरज आहे.