पिंपरी : पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या सर्व २०३ उद्यानांमध्ये 'ऑक्सिजन सेंटर' उभारण्यात येणार आहेत. या अभिनव उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असून, वाढते प्रदूषण लक्षात घेता हरित उपक्रमांना गती देण्यावर भर राहणार आहे, अशी घोषणा महापौर रती लांडगे यांनी केली. महापौर पदाचा कार्यभार स्वीकारून महिना पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी (दि.६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महापौर लांडगे म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर चिखली आणि आकुर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रांचा आढावा घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी, तसेच नियमित व सुरळीत पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर उपस्थित होत्या.
कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणि संकल्पनांचा अभ्यास करून त्या राबविण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रांमधून अधिकाधिक वृक्षलागवड, हरित क्षेत्र वाढविणे आणि स्वच्छ हवेचे महत्त्वत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. शहरातील उद्याने अधिक हिरवीगार आणि पर्यावरणपूरक होतील.
राज्य शासनासोबत १० महत्त्वाचे विकास प्रकल्पराज्य शासन आणि महापालिकेच्या संयुक्त माध्यमातून शहरात १० महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये कचरा व्यवस्थापन, शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
अण्णासाहेब मगर स्टेडियमचाही विकासअण्णासाहेब मगर स्टेडियम खासगी भागीदारीतून विकसित करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचा मानस असल्याचे लांडगे यांनी सांगितले. यामुळे क्रीडापटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील आणि राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येईल.
भटक्या श्वानांच्या समस्येवर व्यापक धोरणभटक्या श्वानांच्या समस्येवरही लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासाठी विविध ठिकाणी श्वान संगोपन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात श्वान पकडण्यासाठी विशेष वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्राणी मित्र आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेऊन या विषयावर सर्वसमावेशक धोरण तयार केले जाणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना भेटीमहत्त्वाकांक्षी 'अजित सृष्टी' प्रकल्प उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सोडविण्यावर प्रशासन भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : Pimpri-Chinchwad will establish 'Oxygen Centers' in 203 gardens to boost environmental conservation. The initiative aims to increase public participation and prioritize green initiatives amid rising pollution. Focus will be on water supply improvements, waste management solutions, and development projects.
Web Summary : पर्यावरण संरक्षण को बढ़ावा देने के लिए पिंपरी-चिंचवड शहर 203 उद्यानों में 'ऑक्सीजन सेंटर' स्थापित करेगा। इस पहल का उद्देश्य बढ़ते प्रदूषण के बीच सार्वजनिक भागीदारी बढ़ाना और हरित पहलों को प्राथमिकता देना है। जल आपूर्ति सुधार, अपशिष्ट प्रबंधन समाधान और विकास परियोजनाओं पर ध्यान केंद्रित किया जाएगा।