स्मार्ट फोनचा अतिवापर धोकादायक

By Admin | Updated: March 3, 2016 01:21 IST2016-03-03T01:21:50+5:302016-03-03T01:21:50+5:30

आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे.

The overuse of smart phones is dangerous | स्मार्ट फोनचा अतिवापर धोकादायक

स्मार्ट फोनचा अतिवापर धोकादायक

पिंपरी : आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, स्मार्ट फोनच्या अतिवापराचे व्यसन धोकादायक असून, त्यातून विविध प्रकारच्या शारीरिक व मानसिक आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन तंत्रज्ञान लेखक सुश्रुत कुलकर्णी यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कच्या वतीने आयोजित व्याख्यानात स्मार्ट फोनचे अंतरंग या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, संजय मालती कमलाकर, विलास रबडे, सायन्स पार्क येथील शिक्षणाधिकारी नंदकुमार कासार, सुनील पोटे उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘स्मार्ट फोनमध्ये संवाद, शिक्षण, वाचन, नोंदी ठेवणे, महिला सुरक्षा, मनोरंजन, खरेदी-विक्री यासंबंधित अनेक चांगली अ‍ॅप्स आहेत. फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपसारखी सोशल माध्यमे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. परंतु, कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. त्यामुळे गरजेपुरता व चांगल्या कामांसाठीच स्मार्ट फोनचा वापर केला पाहिजे.’’
विलास रबडे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार कासार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The overuse of smart phones is dangerous