शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत रुजतोय ‘उद्रेकाचा पॅटर्न’; रिपोर्ट उशिरा आल्याने मोशीत क्वारंटाइन सेंटरमध्ये नागरिकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 11:44 IST

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा सोमवारी झाला होता उद्रेक

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांना निर्बंध नकोसे     

पिंपरी : कोरोना चाचणीच्या अहवालास उशीर झाल्याने मोशीतील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी गोंधळ घातला. चांगले जेवण मिळत नसून इतर सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार करीत त्यांनी केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा सोमवारी उद्रेक झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मोशीत क्वारंटाईन सेंटरमध्ये उद्रेकाचा प्रकार समोर आला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिकांना निर्बंध नकोसे झाले असून, त्याच मानसिकतेतून उद्रेकाचा पॅटर्न रुजत असल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मोशी येथे आदिवासी विद्यार्थी केंद्रात क्वारंटाइन सेंटर करण्यात आले आहे. पुरुष, महिला तसेच लहान मुलांनादेखील या केंद्रात क्वारंटाइन करण्यात येते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क तसेच लो रिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांना या केंद्रात क्वारंटाइन करण्यात येते. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांचे तेथे विलगीकरण केले जाते. त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना पुढील उपचारांसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात येते. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सोडून देण्यात येते. 

मोशीतील या केंद्रात मंगळवारपर्यंत २२७ जण क्वारंटाइन होते. त्यातील काही जण शुक्रवारी सायंकाळी, शनिवारी सकाळी येथे दाखल झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ते नागरिक अस्वस्थ झाले. आमचे रिपोर्ट का आले नाहीत, आम्हाला येथे का बंद करून ठेवले आहे, असे म्हणून त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्राच्या मुख्य दरवाजावर एकत्र आले. आम्हाला बाहेर जाऊ द्या, असे त्यांनी तेथील आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्यावेळी काही जणांनी त्यांच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ केले. त्यात नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आम्हाला जाऊ द्या, अन्यथा आम्ही आत्महत्या करू, असेही काही नागरिकांनी आरोग्य कर्मचाºयांना सांगितले. त्याबाबतचे व्हिडीओ व्हायरलदेखील झाले आहेत.  

मोशीतील केंद्रात काही जणांना कुटुंबांसह क्वारंटाइन केले आहे. एकट्या असलेल्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. सध्या २२७ जण येथे क्वारंटाइन असून, त्यातील काही जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल येण्यास विलंब झाला. क्वारंटाइन नागरिकांना दररोज नाश्ता, दोन वेळा जेवण व चहा, मुलांसाठी दूध दिले जाते. सामाजिक संस्थामार्फतही सुविधाही पुरविण्यात येत आहेत.- डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

---------क्वारंटाइन सेंटरमधील काही जणांच्या तक्रारी होत्या. खोल्यांमध्ये दररोज नियमित साफसफाई होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांच्या खोल्यांमध्ये पोलिसांनी झाडलोट करून दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येतात. - राजेंद्र कुंटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी-भोसरी. 

------------काही खोल्यांमध्ये अस्वच्छता होती. त्यामुळे त्या खोल्यांमधील नागरिकांनी गोंधळ घातला. नंतर खोल्यांमध्ये स्वच्छता करून देण्यात आली. त्यानंतर सर्व शांत झाले. काही जणांचा गैरसमज झाला होता. त्यातून हा प्रकार वाढत गेला. परंतु, त्यामध्ये तथ्य नाही. - एक क्वारंटाइन नागरिक, मोशी केंद्र

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmoshiमोशीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस