शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

खाद्यपदार्थांना आॅनलाइन मागणी, शहरातील ग्राहकांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 23:47 IST

अ‍ॅपद्वारे आॅफर : शहरातील ग्राहकांचाही मिळतोय प्रतिसाद

पिंपरी : आॅनलाइन खाद्यपदार्थांची सेवा घरपोच देण्यासाठी विविध कंपन्या या व्यवसायात दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची स्पर्धादेखील वाढलेली आहे. ग्राहकांनी आपल्याच अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थ मागवावेत म्हणून वेगवेगळ्या ‘आॅफर’ दिल्या जातात. नागरिकांकडूनही या ‘आॅफर’ला प्रतिसाद मिळत असून, खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यावर त्यांचा भर आहे.

आॅनलाइन खाद्यपदार्थ सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांकडून अ‍ॅपमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मागणी केलेल्या खाद्यपदार्थाला किती वेळ लागेल, डिलिव्हरी बॉय हॉटेलमधून निघाला की नाही याची माहिती अ‍ॅपमधून मिळते. डिलिव्हरी बॉय कुठपर्यंत पोहचला आहे, त्याचे लोकेशन अशा विविध सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अ‍ॅपवरून खाद्यपदार्थाची नोंदणी केल्यानंतर ग्राहकाला त्याचा मोबाइल क्रमांक नोंद करावा लागतो. त्यानंतर ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) उपलब्ध होतो. तो ओटीपी निर्देशित केल्याप्रमाणे नोंद केला की, आपली खाद्यपदार्थाची मागणी नोंद होते अर्थात ‘आॅर्डर’ स्वीकारली जाते. त्यानंतर आपण मागवलेले खाद्यपदार्थ आपल्यापर्यंत पोहेचेपर्यंत त्याचे संपूर्ण लोकेशन कळते. या अ‍ॅपमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खाद्यपदार्थ कोणत्या हॉटेलमधून मागवायचे आहेत हे आपण ठरवू शकतो. या सर्व गोष्टींमुळे तरुणाईचा आॅनलाइन खाद्यपदार्थ खरेदीवर भर दिलेला आहे.

या व्यवसायात उतरलेल्या कंपन्या लाखो रुपयांची उलाढाल करीत आहेत. यामुळे हॉटेलमध्येजाणाºयांपेक्षा आॅनलाइन आॅर्डरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हॉटेलमध्ये ‘आॅफर’ नसते. मात्र ‘अ‍ॅप’वर विविध आॅफर दिल्या जातात. त्यामुळे खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यासाठी ग्राहकांमध्ये स्पर्धा लागली आहे. तरूण अ‍ॅपद्वारे खाद्य पदार्थ मागविण्यासाठी पसंती देत असल्याचे दिसत आहे.आॅनलाइन खाद्यपदार्थ मागणी वाढली आहे. एका हॉटेलात दिवसभरात ५० ते ६० ‘आॅर्डर’ केल्या जातात. आॅनलाइन खाद्यपदार्थांच्या मागणीमुळे हॉटेलमध्ये बसून खाणाºयांची संख्या कमी होत आहे. आपल्या पसंतीच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्याचा पर्याय या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलच्या व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. - सुनील अग्रवाल, हॉटेल व्यावसायिककॉलेजमध्ये असताना आॅनलाइन पदार्थ मागविले की, लवकर येतात. त्यासाठी बाहेर पडून हॉटेलमध्ये जाण्याची गरज पडत नाही. वेळही वाचतो. आपल्याला पाहिजे आहे ते आपण मागवू शकतो. पिझ्झा, बर्गर, पास्ता यावर नेहमी आॅफर असतात. एकावर एक मोफत ही आॅफर तर नेहमीच असते. नोंदविलेली मागणी काही कारणास्तव रद्द केली, तर पैसे परत मिळतात. त्यामुळे खाद्यपदार्थ आम्ही आॅनलाइन मागवतो.- नीलेश नागरगोजे, महाविद्यालयीन तरुण 

टॅग्स :onlineऑनलाइनfoodअन्न