शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:23 IST

कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाऊल

ठळक मुद्देबाजारात आलेले ओले कांदे घेण्यापेक्षा साठवण केलेला व चांगला वाळलेला कांदा खरेदीस प्राधान्य

किवळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला ग्राहक मिळत नाही. परिणामी कांदयाचा बाजारभाव खूपच कमी झाला असल्याने किन्हई व परिसरातील काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी साठवण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.        सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात कांदा गरजेची बाब झाला आहे. रोजच्या जेवणात कांदयाचा मुबलक वापर करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर सर्व पदार्थात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. कांद्याचे औषधी गुणधर्म हेही कांदा वापरातील महत्वाचे कारण आहे. कांद्याचे बाजारभाव कमी जास्त होत असल्याने ग्राहक कांदे खरेदी करताना काळजी घेत असल्याचे दिसून येते. तसेच बाजारात आलेले ओले कांदे घेण्यापेक्षा साठवण केलेला व चांगला वाळलेला कांदा खरेदीस प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.         दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे भाजीपाला बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला विक्रीवर सर्वत्र विविध बंधने घालण्यात येत आहेत. बाजारात कांद्याला ग्राहक मिळत नाही . त्यामुळे कांद्याचे बाजार आणखी कमी होत चालले आहेत. बाजारभावाचा फटका शेतक?यांना बसत असल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. तापमान बदलामुळे पोषक वातावरण न मिळाळ्यास कांद्याचे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवण करण्यास सुरुवात केली आहे. कांदा साठवण केल्याने कांद्याला बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रीसाठी आणून काही प्रमाणात फायदा मिळविणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.     कांदा साठवण करणे हे अत्यंत जोखमीचे आहे. साठवण करताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब झाल्यास फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या बाजारात उठाव नसल्याने भावात घसरण झालेली आहे. त्यामुळे तोटा घेऊन विकण्यापेक्षा साठवण केल्यास पुढे फायदा होऊ शकतो . बाळासाहेब दिवसे , कांदा उत्पादक शेतकरी व कृषी मित्र , किन्हई

टॅग्स :kiwaleकिवळेonionकांदाFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस