शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून सांगवीत एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:01 IST

नातेवाईक महिलेशी  प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला.

पिंपरी : नातेवाईक महिलेशी  प्रेमसंबंध असलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी औंध रुग्णालय परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश जीवन खेराले (वय ४०, रा. कामगार वसाहत, औंध ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरकाल जीवन खेराले (वय २८) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विशाल अशोक घोरन (वय ३०), रोहित किशोर घोरन (वय ३०), हितेश ऊर्फ गुड्डू किशोर घोरन (वय २६, सर्व रा. कामगार वसाहत) अशी आरोपींची नावे आहेत.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश याचे विशाल सोबत शनिवारी (दि.२०) किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्याचा राग विशालच्या मनात होता. तसेच रोहित याच्या नातेवाईक महिलेशी नीलेशचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याची रोहितला कुणकुण लागली होती. यातूनच रोहितने नीलेशच्या अंगावर एकदा दुचाकी घातली होती. हा सर्व प्रकार विशालला माहीत झाला. त्याने रोहित आणि त्याचा भाऊ हितेश यांच्याशी संगनमत करून नीलेशला मारण्याचा कट रचला.   शनिवारी रात्री तिघांनी मिळून नीलेशला औंध रुग्णालय परिसरात आडबाजूला नेले. तिथे नीलेशच्या डोक्यात फरशी घालून त्याला जिवे मारले. यामध्ये नीलेशच्या डोक्याला आणि चेहºयाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :SangviसांगवीMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस