चिंचवडमध्ये एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 11:16 IST2018-10-15T11:13:40+5:302018-10-15T11:16:23+5:30

व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही; पोलीस तपास सुरू

one man killed in pimpri chinchwad | चिंचवडमध्ये एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या

चिंचवडमध्ये एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या

चिंचवड: तळवडे येथील स्मशानभूमी परिसरात झाड रस्त्याच्या कडेला बाभळीच्या झाडाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यक्तीचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला आहे. पोलीस सध्या या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मृतदेह आढळल्याची माहिती समजताच देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. देहरोड पोलीस ठाण्यात गेल्या तीन दिवसात घडलेली खुनाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे या भागातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

Web Title: one man killed in pimpri chinchwad