शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

एका तासात विद्यार्थ्यांनी 2 लाख 30 हजार कागदी पिशव्या बनविण्याचा केला जागतिक विक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:34 PM

प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

लोणावळा : प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये शाळेच्या 3 हजार 657 विद्यार्थ्यांनी एक तासात तब्बल 2 लाख 30 हजार 373  कागदी पिशव्या बनविण्याचा जागतिक विक्रम तयार केला आहे. वर्ल्ड रेकाॅर्ड आॅफ इंडिया गुजरात या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी या जागतिक रेकाॅर्डची घोषणा करत शाळेला प्रमाणपत्र देऊन गौरविले. वर्ल्ड रेकाॅर्ड आॅफ इंडिया गुजरात या एनजीओचे चीफ एडीटर पवन सोलंकी व इव्हेंट मॅनेजर मेघा क्रिश्चन यांच्या निरिक्षण व पर्यवेक्षणाखाली हा उपक्रम आज पार पडला.यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष बच्चुभाई पत्रावाला, मुख्याध्यापक सुधरेंद्र देशपांडे, उपप्राचार्य मारुती तारु, उपमुख्यध्यापिका श्रीमती मधुमालती संधीर, शिक्षकेत्तर कर्मचारी भगवान आंबेकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.  पिशव्या बनविण्याकरिता आवश्यक असणारे वृत्तपत्रांचे कागद व गम शाळेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आले होते. शाळेच्या पटांगणात वर्गवारी प्रमाणे विद्यार्थी गोलाकार बसून पिशव्या बनविण्यात मग्न झाले होते. मुलांमध्ये देखिल जास्तीत जास्त पिशव्या बनविण्याची स्पर्धा लागली असल्याचे चित्र पहायला मिळाले. बनविलेल्या कागदी पिशव्या ह्या शहरातील मेडिकल दुकानदारांना भेट देण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सुधरेंद्र देशपांडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये कागदी पिशव्या बनविण्याबाबत जागृकता निर्माण होण्यासोबत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा हा संदेश देखिल देण्यात आला. सध्या प्लास्टिकमुळे निर्सगाची मोठी हानी होत असून प्लास्टिक निर्मूलन करण्याचे मोठे आवाहन सरकारपुढे आहे. भविष्यात कागदी पिशव्या हा प्लास्टिकवर रामबाण उपाय ठरु शकतो असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाचे मुख्य सुत्रधार समन्वयक व अविष्कार फाऊंडेशनचे दीपक पिसे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :lonavalaलोणावळाSchoolशाळा