पिंपरी : शेतातील बोरच्या मोटारसाठी टाकलेल्या आकड्याची वायर तारेच्या कुंपणाला चिकटून त्यात वीजप्रवाह उतरला. त्यामुळे विजेच्या धक्क्याने एकासह शेळीचा मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील सोमाटणे गावाच्या शिवारात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. रामा पांडुळे, असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी त्यांचा मुलगा काळू रामा पांडुळे (वय ३५, रा. पारगाव, ता. पुरंदर, मूळगाव मुर्टी, ता. बारामती) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वसंत दत्तात्रय मुºहे (रा. सोमाटणे, ता. मावळ) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्या शेतात असलेल्या बोरच्या मोटरसाठी शेताजवळीत खांबावर आकडा टाकून वीज घेतली. त्यांच्या निष्काळजीपणाने आकड्याची वायर शेताजवळ असलेल्या तारेच्या कुंपणाला चिकटली. त्यामुळे कुंपणात वीजप्रवाह संचारला. त्या विजेच्या धक्क्याने फियार्दी यांचे वडील रामा पांडुळे यांचा व एका शेळीचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
मावळ तालुक्यातील सोमाटणे गावाच्या शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:12 IST