वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 14, 2016 00:39 IST2016-09-14T00:39:41+5:302016-09-14T00:39:41+5:30
महामार्गालगत एकास धक्काबुक्की केल्याने त्याचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने कंटेनरचा जोरात फटका लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ ही घटना मंगळवारी

वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
भोसरी : महामार्गालगत एकास धक्काबुक्की केल्याने त्याचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने कंटेनरचा जोरात फटका लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-मुंबई जुना महामार्गावर खासगी कंपनीसमोरील मुख्य गेटसमोर फु गेवाडी येथे घडली़ सचिन किसन कुल्लाळ (रा़ संत तुकारामनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे़ या प्रकरणी विनायक बाळकृष्ण ठोंबरे याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आरोपी विनायक याने सचिनला (गणेश सहकारी गृहरचना संस्था, संत तुकारामनगर)
या ठिकाणी धक्काबुक्की केली़
धक्काबुक्कीत सचिनचा तोल गेल्याने तो रस्त्यात पडला. तेवढ्यात आलेल्या कंटेनरचा
त्याला फटका बसला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ (वार्ताहर)