कामशेत : मध्य रेल्वेच्या डाउन ट्रकवर शनिवार ( दि. ८ ) रोजी पहाटेच्या सुमारास रेल्वे मालगाडीची धडक बसल्यामुळे शैलवर्म ए अमावाती ( वय. ४४ रा. ततनेरी, मेत रोड, मदुराई, तमिळनाडू ) या व्यक्तीचा रेल्वेलाईन ओलांडताना मृत्यू झाला आहे. तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि. ७ ) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी कामशेत शहर हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न. १४४/३८ जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेल्वम ए अमावती यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मयत हा कामशेत मध्ये वास्तवास असलेल्या आपल्या साडू कडे आला होता. याप्रकरणी पुढील तपास लोहमार्ग पोलीस हवालदार एल. जी. पठाण करत आहेत.
धावत्या मालगाडी खाली सापडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:22 IST