इंद्रायणी नदीत कार पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, अद्याप एक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 11:54 IST
भर पावसात एनडीआरएफची टीम व लोणावळा येथील शिवदुर्ग ग्रुपच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती.
इंद्रायणी नदीत कार पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, अद्याप एक जण बेपत्ता
वडगाव मावळ : टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणीनदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून कारइंद्रायणीनदीच्या पात्रात पडली होती. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी घडली होती. रात्री उशिरा सुरु असलेल्या शोधमोहिमेत एकाचा मृतदेह मृतदेह मिळाला. बुडालेला दुसरा युवक अद्याप मिळाला नाही. संकेत नंदू असवले (वय २१ रा. टाकवे ) असे मृत युवकाचे नाव असून अक्षय मनोहर जगताप याचा शोध लागला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी पुलाच्या कठड्याला धडकून कार नदीपात्रात पडण्याची धक्कादायक दुर्घटना घडली होती. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पाणबुड्यांच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली होती. अक्षय संजय ढगे ( वय २० हा युवक पाण्यातून पोहत पुलाजवळ आला.नागरिकांनी दोराच्या साह्याने त्याला बाहेर काढले. तर अक्षय मनोहर जगताप (वय २०) , संकेत नंदु असवले (वय २०) हे कारसह पाण्यात बुडाले. होते. भर पावसात एनडीआरएफची टीम व लोणावळा येथील शिवदुर्ग ग्रुपच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. गुरूवारी रात्री उशिरा पाण्यातून कार काढली. त्यात संकेतचा मृतदेह मिळाला. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली. आज पुन्हा शोध मोहीम सुरू करणार आहे.