शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड मध्ये दिवसाआड पाणी पुरवठा विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:44 IST

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातोे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय : पाणी चोरी अन् गळतीने नागरिकांना नाहक त्रास 

पिंपरी : पवना धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचेही वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पाणीचोरी आणि गळती यावर उपाययोजना करण्यात महापालिका यंत्रणा अपयशी ठरत आहे.पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातोे. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाऱ्यांतून जलउपसा केंद्रातून पाणी शहरात पुरविले जाते.

दिवसाला ४८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा झाला असला, तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेले नियोजन विस्कळीत झाले आहे. ..............४० टक्के पाणीगळतीकडे दुर्लक्ष पाणीकपात करीत असताना पाणीगळती आणि चोरीकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागापुढे चोरी आणि गळतीचे मोठे आव्हान आहे. शहरात पाणी गळतीचे प्रमाण चाळीस टक्के आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणी गळतीवर नियंत्रण आणू असा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. पाणी गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील विविध भागात पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. विठ्ठलनगर लांडेवाडी भोसरीत परिसरात पाण्याची गळती होत आहे. तसेच एमआयडीसी टेल्को रोड येथील व्हॉल्व्हवरून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच काळाखडक, वाकड येथे महापालिकेच्या वाहिनीला पाइप जोडून पाण्याची चोरी केली जात आहे. थेरगाव बिर्ला हॉस्पिटलजवळील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत आहे. आकुर्डी रेल्वेस्टेशन परिसरातही पाणी गळतीचे प्रमाण अधिक आहे. .............

झोपडपट्टी भागात अनधिकृत नडजोळाद्वारे पाणी चोरी 

१ महापालिका क्षेत्रात विविध भागात पाणी चोरीचे प्रमाण अधिक आहे. तसेच झोपडपट्टीच्या परिसरातील नळजोड हे विनापरवना घेतले आहेत. ते नियमितीकरणासाठी महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्यांना टॅप मारून पाणी चोरी केली जात आहे. 

२ झोपडपट्ट्यांतील पाणीचोरीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या वतीने अभय योजना राबविण्यात आली. त्यात सुमारे सहा हजार नळजोडांची नोंदणी अधिकृत करण्यात आली. मात्र, झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. .....

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीDamधरण