शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Omicron: पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 20:29 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनवर उपचार करण्यासाठी भोसरी आणि पिंपरीत दोन रुग्णालय सज्ज ठेवली आहेत

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत बुधवारी ओमायक्रॉनचे (omicron new cases found in pimpri chinchwad)  सहा रुग्ण आढळले आहेत. त्यात तीन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. जपान, सिंगापूर, केनीयाहून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनवर उपचार करण्यासाठी भोसरी आणि पिंपरीत दोन रुग्णालय सज्ज ठेवली आहेत. आजपर्यंत परदेशातून आलेल्या ४५ तर त्यांच्या संपर्कातील २८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहेत. या रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या २० जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांच्या संपर्कातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रँडम तपासणीत नऊ जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यात उपचार घेऊन २५ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णापैकी एक जण जपानमधून, एक जण सिंगापूर, एक जण केनियातून, १ युऐसवरून, २ UAE वरून आलेला आहे. सर्वांवर भोसरीतील महापालिका आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यापैकी १०९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन