शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईलगळती ; वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 4:01 PM

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत रोहित्र फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑईलगळती झाली.

पिंपरी : स्पाइन रोडवरील भाजी मंडई चौक ते शरदनगर सर्व्हिस रस्त्यावर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत रोहित्र फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑईलगळती  झाली. त्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली. वेळीच दक्षता घेतल्याने दुर्घटना टळली. हे विद्युत रोहित्र शरदनगरमधील हनुमान मंदिराच्या बाजूला आहे़. मंदिराच्या भिंतीलगत रोहित्र बसविलेले आहे़. हा परिसर रहदारीचा असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्पाइन रस्त्याने संभाजीनगरकडून शरदनगरला येण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे भाजी मंडई चौकाकडून भोसरीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर वाहनचालकांना करावा लागत आहे़ हे रोहित्र पदपथावर असल्याने पादचाऱ्यांनादेखील रोहित्रापासूनच ये-जा करावी लागत आहे़ बाजूलाच मंदिर असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना अशा घटनेने धोका संभवत आहे़     रामनवमीनिमित्त येथे सप्ताह सुरू आहे़. शनिवारी रामनवमी असल्याने रामजन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते़. त्या वेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता़. परंतु, ही घटना दुपारी दोनच्या दरम्यान घडल्याने अनर्थ टळला़. हे विद्युत रोहित्र पदथावर, मंदिराच्या बाजूला तसेच रहदारीच्या ठिकाणी असल्याने धोकादायक बनत आहे़. तरी महावितरणाने याची दखल घेऊन ते त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे़.    रोहित्रामधून मोठ्या प्रमाणात ऑईलगळती झाल्याने ते रस्त्यावर आले़ त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला़ मंदिर परिसरातील नागरिकांनी वाहनचालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला़.  ऑईलमुळे गाडी घसरून आपघात होण्याची शक्यता असल्याची जाणीव नागरिक करून देत होते़. तरीदेखील वाहनचालक ऑइल पसरलेल्या रस्त्यावरून वाहतूक करत असल्याने रोहित्राच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात ऑईल पसरले गेले़. त्यामुळे वाहन घसरून आपघात घडण्याची शक्यता वाढली आहे़.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक