अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 10:15 PM2020-10-26T22:15:55+5:302020-10-26T22:16:25+5:30

सकाळी नऊपर्यंतच बहुतांश विक्रेत्यांकडील झेंडू संपल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर वाढवून प्रतिकिलो ६०० रुपयांपर्यंत नेला .

Ohh ! Marigold in Pimpri Rs 600 per kg; Retailers celebrate 'Dussehra' | अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’ 

अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’ 

Next
ठळक मुद्देचढ्या दराने विक्री : दसऱ्याला केवळ सहा टन आवक

पिंपरी : खंडे नवमीनिमित्त शनिवारी पिंपरी येथील फूल बाजारात ४० टन झेंडूची आवक झाली होती. मात्र दसऱ्याच्या दिवशी अर्थात रविवारी केवळ सहा टन आवक झाली. ठोक बाजारात २०० रुपये प्रतिकिलो असलेला झेंडूचार दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६०० रुपयांवर गेला. आवक कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री केली.

पिंपरी येथील फूल बाजारात रविवारी खेड तालुक्यातील शिक्रापूर परिसर, चौफुला तसेच अहमदनगर येथून झेंडूची आवक झाली होती. मात्र ही आवक खूप कमी होती. त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला. सकाळी नऊपर्यंत बहुतांश विक्रेत्यांकडील झेंडू संपला होता. त्यानंतर काही किरकोळ विक्रेत्यांनी दर वाढवून प्रतिकिलो ६०० रुपयांपर्यंत नेले होते.

दसऱ्याच्या दिवशी किरकोळ तसेच घरगुती ग्राहकांकडून झेंडूची खरेदी केली जाते. किरकोळ विक्रेते, व्यावसायिक तसेच घराला सजावट करण्यासाठी ही खरेदी होते. असे असले तरी ही ग्राहकसंख्या मोठी असते. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असते. मात्र प्रतिकिलो ६०० रुपये दर देऊनही अनेक ग्राहकांना झेंडू मिळाला नाही. काहींनी कमी खरेदी केली.      
-------------+-----------
खंडेनवमीलाच झाली मोठी खरेदी
उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील विविध कंपन्या व लघूउद्योगांतर्फे खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले. शस्त्रपूजनानिमित्त झेंडुच्या फुलांची मोठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे अष्टमी व खंडेनवमीलाच त्यांच्याकडून फुलांची मोठी खरेदी करण्यात आली होती.
-------------------+-------------
वाहनांचे पुष्पहार आकुंचले
घरोघरी फुलांची सजावट करण्यात येते. तसेच दस-यानिमित्त वाहनांनाही झेंडूंचेही आकर्षक पुष्पहार लावण्यात येतात. मात्र यंदा झेंडू चढ्या दराने विक्री होत असल्याने या पुष्पहारांचा आकार लहान झाला होता. तर झेंडू उपलब्ध न झाल्याने काही जणांना वाहनांना पुष्पहाराची सजावट करता आली नाही.  
---------------+-----------
खंडेनवमीला झेंडूची समाधानकारक आवक झाली. त्याचप्रमाणे अपेक्षित असतानाही रविवारी आवक झाली नाही. त्यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांकडून झेंडूची चढ्या दराने विक्री झाली.  

- राजकुमार मोरे, अध्यक्ष, आडते संघ, पिंपरी-चिंचवड फुलबाजार
----------++----
फुलांचा दर
शेवंती - २०० (प्रति किलो)
गुलछडी - २०० (प्रति किलो)
अष्टर – ३० ते ४० (चार गुच्छ)
जरबेरा - ५० (१० फुलांचा गुच्छ)
डच गुलाब – १०० ते १५० (२० फुलांचा गुच्छ)
साधा गुलाब – २० (१० फुलांचा गुच्छ)
--------+------------
झेंडूचा दर (प्रतिकिलो)
साधे गोंडे - १५० ते १६०
कलकत्ता – १७० ते २००

Web Title: Ohh ! Marigold in Pimpri Rs 600 per kg; Retailers celebrate 'Dussehra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.