शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

इंडस्ट्रियल टाऊनशिपचा प्रस्ताव कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:23 AM

अंमलबजावणीची बारा वर्षांपासून प्रतीक्षा

वडगाव मावळ : तळेगाव औद्योगिक वसाहतीत शासनाने १९९८ मध्ये १४६२ एकर जमीन खरेदी केली होती. येथे औद्योगिकनगर (इंडस्ट्रियल टाऊनशिप) उभारण्याची घोषणा १२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने ही घोषणा कागदावरच फिरत राहिली.मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, आंबी, बदलवाडी, कातवी या ठिकाणी १४६२ एकर जागा शासनाने संपादित केली आहे. त्यातील ६०० एकर जमीन फ्लोरिकल्चर पार्कसाठी, तर ८०० एकर जमीन उद्योगधंद्यासाठी वापरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या भागात जनरल मोटर्स जेसीबी, महिना बेरिंग, फासको, हुसको अशा छोट्या-मोठ्या सुमारे तीस कंपन्या आहेत. याखेरीज एमआयडीसीकडे फ्लोरिकल्चर व अन्य उद्योग सुरू करण्याबाबतचे अर्ज पडून आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी बनवण्याचे स्वप्न शासनाचे आहे. येथे ५० व्यावसायिकांनी शीतगृहाची उभारणी करून फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. औद्योगिकनगर उभारण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे येथील फूल निर्यातदार व इतर व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कर गोळा होतो.परंतु त्याचा उपयोग तेथील समस्या सोडविण्यासाठी होत नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. फ्लोरिकल्चर पार्कच्या मूळ आराखड्यात मान्य करण्यात आलेल्या पार्किंग, ग्रेडिंग, ट्रान्स्पोर्ट, कोल्ड स्टोअरेज, हार्वेस्टिंग यासह अन्य सुविधांची वानवा आहे.तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांनी टाऊनशिप उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले होते.परंतु अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली पाहिजे तशा झाल्या नाहीत. नवलाख उंब्रे, नाणोली, आंबी, मंगरूळ व अन्य गावे औद्योगिकनगरात समाविष्ट नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. बाहेरील कामगारांमुळे या गावांतील लोकवस्ती वाढत चालली आहे. परंतु गावांना इंडस्ट्रीयल टॅक्सचा लाभ मिळत नसल्याने तेथील विकासकामेही धिम्या गतीने सुरू आहेत. या भागातील उद्योजकांना काही अडचणी निर्माण झाल्यास थेट पुणे व पिंपरी-चिंचवडला जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी टाऊनशिप होणे गरजेचे आहे.- रामदास काकडे, उद्योजकटाऊनशिप होणे गरजेचे आहे. या भागातील गावांचा त्यामध्ये समावेश झाल्यानंतर विकासाला गती मिळेल. शासनाने लवकरात लवकर टाऊनशिप उभारावी. - दतात्रय पडवळ, नवलाख उंब्रे गावचे सरपंच