शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

स्मार्ट सिटीतील शाळेत अद्याप नाही स्वच्छतागृह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:55 IST

हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे.

ठळक मुद्दे कासारवाडी : दोन वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षकांची होतेय कुचंबणा

शीतल मुंडे- पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे. शहराला स्वच्छतेचे बक्षीस मिळाले आहे. हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे. मात्र महापालिकेच्या कासारवाडी येथील प्राथमिक शाळेला गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतागृह नाही. त्याचप्रमाणे शाळेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. शाळेची छतगळती होत आहे, शाळेला रंगरंगोटीची आवश्यकता आहे. शाळेतील वर्गखोल्यांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जात विद्यार्थ्यांना मात्र शिक्षकाचे धडे गिरवावे लागतात.प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी इतरत्र जावे लागते. शाळेमधील वर्गांची पाहणी केली असता वर्गामध्ये अनेक ठिकाणी भिंतींना पापुडे आलेले आहेत. ठिकठिकाणी वर्गखोल्या गळत आहेत. शाळेतील वर्गखोल्यांना खिडक्यादेखील नाहीत. पाऊस आल्यानंतर वरून गळणारे छत आणि खिडक्यांमधून येणारे पाणी यांच्यापासून संरक्षण करत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. शाळेमध्ये संगणक विभाग स्वतंत्र आहे. मात्र संगणक विभागदेखील मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे पावसाच्या पाण्यापासून संगणक वाचवताना शिक्षकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. शाळेचा परिसर छोटा असल्यामुळे खेळण्यासाठी मैदानच नाही. ..........* शाळेला सांडपाणी मिळत नाहीविद्यार्थ्यांना खिचडी खाण्यासाठी महापालिकेकडून प्लेट देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या सर्व प्लेट शाळेमध्ये धूळ खात पडलेल्या आहेत. कारण प्लेट धुण्यासाठी सांडपाणीदेखील शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्लेटचा वापर करता येत नाही. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याने शाळेमध्येच शौचालय केले तर साफ करण्यासाठीदेखील शाळेमध्ये पाणी नाही. 

* शिक्षण विभाग घेत नाही दखलकासारवाडीतील शाळेमध्ये मूलभूत सुविधाच नाहीत. याबाबत शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. तीन ते चार वेळा स्मरणपत्र देखील दिलेली आहेत. मात्र शाळेला शिक्षण विभाग कुठलाच प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे वर्गांमध्ये लाईट, फॅन नाहीत.

 

टॅग्स :kasarwadiकासारवाडीSchoolशाळाSmart Cityस्मार्ट सिटी