शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

पिंपरी चिंचवड परिसरात वाहन तोडफोड सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 5:11 PM

पिंपळे निलख येथे रस्त्यावर आणि घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली.

ठळक मुद्देपावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

पिंपरी : मोहननगर परिसरात गुरूवारी रात्री वाहनांची तोडफोड झाली. ही घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री पिंपळे निलख येथे घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबेना अशी असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.पिंपळे निलख येथे रस्त्यावर आणि घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली. टोळक्याने सात वाहनांच्या काचा फोडल्या. परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाहन तोडफोडीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयूर दिलीप मदने (वय ३०, रा. विनायकनगर, पिंपळे निलख, सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. विनायकनगर, पिंपळे निलख येथे फिर्यादी मयूर यांच्यासह नागरिकांनी हरदेव कृपा इमारतीच्या वाहनतळावर वाहने उभी केली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास शस्त्र घेऊन आलेल्या टोळक्याने सात वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद झाले नसल्याचे सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसfour wheelerफोर व्हीलर