पिंपरी : मोहननगर परिसरात गुरूवारी रात्री वाहनांची तोडफोड झाली. ही घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री पिंपळे निलख येथे घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबेना अशी असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.पिंपळे निलख येथे रस्त्यावर आणि घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली. टोळक्याने सात वाहनांच्या काचा फोडल्या. परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाहन तोडफोडीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयूर दिलीप मदने (वय ३०, रा. विनायकनगर, पिंपळे निलख, सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. विनायकनगर, पिंपळे निलख येथे फिर्यादी मयूर यांच्यासह नागरिकांनी हरदेव कृपा इमारतीच्या वाहनतळावर वाहने उभी केली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास शस्त्र घेऊन आलेल्या टोळक्याने सात वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद झाले नसल्याचे सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात वाहन तोडफोड सत्र थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:12 IST
पिंपळे निलख येथे रस्त्यावर आणि घराजवळ उभ्या केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली.
पिंपरी चिंचवड परिसरात वाहन तोडफोड सत्र थांबेना
ठळक मुद्देपावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद