शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

१५०० रुपये नको, आम्हाला सुरक्षितता द्या; गृहमंत्री राजीनामा द्या, पिंपरीत शिवसेनेचे आंदोलन

By विश्वास मोरे | Updated: August 21, 2024 17:02 IST

गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पक्ष फोडण्याची, सत्तेची खुर्ची वाचविण्याची जबाबदारी

पिंपरी: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे ) शहर महिला आघाडी व शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी आकुर्डीत घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली. महिलांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला. 

आकुर्डीतील आंदोलनाला जिल्हा संघटिका शैला खंडागळे, उपसंघटक वैशाली मराठी, शहर संघटिका अनिता तुतारे, उपशहर प्रमुख कामिनी मिश्रा, पिंपरी विधानसभा प्रमुख वैशाली कुलथे, माजी शहर संघटक सुशीला पवार, शहर संघटक संतोष सौन्दणकर, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मीनल यादव, रवी लांडगे, उपजिल्हा संघटक दस्तगीर मणियार, उपशहर प्रमुख रजनी वाघ, योगिनी मोहन आदी उपस्थित होते. सुलभा उबाळे म्हणाल्या, 'सत्तेत असलेल्या भाजपला  जनतेच्या सुरक्षेबाबत काही देणे घेणे नाही. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पक्ष फोडण्याची, सत्तेची खुर्ची वाचविण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनमानीवर गृहमंत्र्यांचा वचक नाही. पर्यायाने पोलीस यंत्रणा अक्षरश: कोलमडलेल्या स्थितीत आहे.  चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित पालकांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. ११ तासाहून अधिक वेळ पालकांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते.  अशा प्रकारची दिरंगाई याआधी महाराष्ट्रात कधीही पाहायला मिळालेली नाही. . रस्त्यावर माणसे  चिरडली जातात मात्र पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यात आपला वेळ खर्ची करते.  यावर गृहमंत्री तात्काळ कारवाई करत नाहीत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था अक्षरशः पायदळी तुडवली जात आहे.' 

फास्टट्रॅक सुनावणी घ्या 

शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात येणार असलेले १५०० रुपये नको. मात्र, आम्हाला सुरक्षितता द्या. आरोपीवर तात्काळ कारवाई करा. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपी विरोधात खटला चालवून चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून द्या, अशी मागणी केली. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाagitationआंदोलनShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेbadlapurबदलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस