शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या भावाचे झाले पाणी..पाणी..! बाटलीबंद पाण्यापेक्षा गायीच्या दुधाला कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 14:59 IST

कृषी व्यवस्थेचा कान असलेला दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरत आहे.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडची पंतप्रधानांकडे अनुदान देण्याची मागणी बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाला कमी भाव

पिंपरी : भारत कृषी प्रधान देश असूनही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. गायीच्या दुधाचे भाव कोसळले असून पाण्याला दुधापेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारने मिळून दुधाला प्रतिलिटर वीस अनुदान देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

भारत हा कृषी प्रधान देश असल्याचे जगाला अभिमानाने सांगितले जाते. जय किसान असा नाराही दिला जातो. कृषी व्यवस्थेचा कान असलेला दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरत आहे. कारण बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाला कमी भाव मिळत आहे. घरच्या गाईच्या एक लिटर दुधाला २१ सप्टेंबर रोजी १९ रुपये भाव मिळाला. तर, थेरगाव येथून घेतलेल्या पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागले. 

राज्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करण्यासाठी गायी-म्हशी मोठ्या प्रमाणावर पाळत असतात. शेतकऱ्याला एका लिटर दुधासाठी सुमारे २५ रुपये खर्च येत आहे. जर्शी गायीला लागणारे पशुखाद्य, औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त होत आहे.         महाराष्ट्रात जो वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा होतो त्यामधील अर्धा वाटा केंद्र सरकारला व अर्धा वाटा राज्य सरकारला मिळत असतो. दूध विक्रीतून शेतकऱ्यांना सध्या जे नुकसान होत आहे, त्याच्या भरपाई पोटी प्रतिलिटर २० रुपये अनुदान देण्यात यावे. त्यातील १० रुपये केंद्र सरकारने आणि १० राज्य सरकारने द्यावे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अनुदानाची ही रक्कम दूध संघाला न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी काळे यांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmilkदूधsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी