शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीची वाहतूक कोंडी नको रे बाबा..!

By विश्वास मोरे | Updated: July 30, 2025 11:48 IST

- दोन मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्ध तास कोंडीचा त्रास : एकेरी मार्ग, करूनही कोंडी काही थांबेना

पिंपरी : विकास आराखड्यातील रस्त्यांचा न झालेला विकास, अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे, सुरू असलेले मेट्रोचे काम आणि बंद सिग्नल यंत्रणा, कोलमडलेले वाहतूक नियोजन यामुळे हिंजवडीतीलवाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिणामी दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. कर्णकर्कश हॉर्न आणि हिंजवडीचा प्रवास ‘कोंडी नको रे बाबा..,’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अभियंत्यांना कामावर पोहोचण्यासाठी दुचाकीवरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या प्रश्नाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव आहे.हिंजवडी येथील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीत येण्यासाठी प्रमुख पाच रस्ते आहेत. मुंबई-पुणे- बंगळुरु महामार्गावरून येण्यासाठी वाकड गावठाणातून तर भुमकर चौक येथून शिवाजी चौक असे दोन, तर कासारसाई येथून शिवाजी चौक आणि टप्पा तीन येथे एक रस्ता येतो. त्याचबरोबर पौडवरून टप्पा तीनकडून आणि म्हाळुंगे-माणगाव रस्त्याने हिंजवडीत येण्यासाठी रस्ता आहे. एमआयडीसीच्या बाहेरील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए, ग्रामपंचायती प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंजवडीतील वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. कोंडीची कारणेसध्या हिंजवडी टप्पा तीनपासून हिंजवडी गावठाण, वाकड-बालेवाडी मार्गे पुण्याला जाण्यासाठी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी सध्या रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर वाकडमधून हिंजवडीकडे जाताना अलीकडे एक किलोमीटर महापालिका हद्दीपर्यंत रस्ता रुंद आहे. मात्र, हिंजवडी परिसरात हा रस्ता कमी रुंदीचा झाला आहे.२) मारुंजी ते हिंजवडी, भुमकर चौक ते लक्ष्मी चौक, यशोदा गार्डन, हिंजवडी, तसेच मेझा नाईन चौक ते भुमकर चौक या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी असते. प्रमुख रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अशा प्रकारची स्थिती शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरही दिसून येते.३) सकाळी हिंजवडीत जाताना आणि सायंकाळी हिंजवडीतून बाहेर पडताना मोठ्याप्रमाणावर कोंडी असते. हिंजवडीचा सर्व भार हा मोटारसायकल, पीएमपी बस, स्कूटर, रिक्षा, कार, टेम्पो ट्रॅव्हलर आणि बस यावरच येऊन पडत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसhinjawadiहिंजवडी