दुरुस्तीसाठी उद्या नाही काही भागांत पाणी

By Admin | Updated: September 7, 2015 04:27 IST2015-09-07T04:27:26+5:302015-09-07T04:27:26+5:30

कृष्णानगर, सेक्टर क्रमांक २० येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही

No change tomorrow, in some areas water | दुरुस्तीसाठी उद्या नाही काही भागांत पाणी

दुरुस्तीसाठी उद्या नाही काही भागांत पाणी

पिंपरी : कृष्णानगर, सेक्टर क्रमांक २० येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, बुधवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
कासारवाडी, फुगेवाडी, अजमेरा कॉलनी, मोरवाडी, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, संत तुकारामनगर, नेहरुनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, मोहननगर, अजंठानगर, आकुर्डी गावठाण, विठ्ठलवाडी, जय गणेश व्हिजन परिसर, विवेकनगर, तुळजाई वस्ती, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, कुदळवाडी, चिखली गावठाण, रामदासनगर या परिसराचा समावेश आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: No change tomorrow, in some areas water