शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:53 IST

वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

ठळक मुद्देवायसीएम प्रकाराबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

पिंपरी : शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाणप्रकरणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालय कोविड समर्पित केले आहे. रविवारी रात्री ११.३० च्या दरम्यान भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केलेल्या शिवीगाळप्रकरणी सुरक्षारक्षक उमेश सरोदे यांनी पिंपरी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. रविवारी रात्री नगरसेवक वाघेरे हे रुग्णालयात आले होते. त्यावेळी ते रुग्णाच्या नातेवाइकांबरोबर वॉर्ड क्रमांक ५०२ मध्ये गेले. त्यानंतर थोड्या वेळाने सिक्युरिटी विभागात एका डॉक्टरांनी दूरध्वनी केला आणि वॉर्डमध्ये एक नगरसेवक वादावादी आणि शिवीगाळ करीत आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर सुरक्षारक्षक वॉर्ड क्रमांक ५०२ मध्ये गेले. त्यावेळीही वादावादी सुरू होती. त्यामध्ये सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांशी वादावादी करणाºया नगरसेवक आणि नातेवाइकांना वॉर्डच्या बाहेर आणले. त्यानंतर प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या सुरक्षारक्षकांनी पिंपरी पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.या घटनेनंतर सोमवारी सकाळी वायसीएममधील डॉक्टर आणि परिचारिकांनी मारहाण आणि शिवीगाळीच्या विरोधात आंदोलन केले होते. शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी वायसीएमला भेट देऊन डॉक्टरांची समजूत काढली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या. त्यानंतर वायसीएमच्या सुरक्षारक्षकांनी २७ जुलैला सायंकाळी पावणेपाचला पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, चोवीस तासांनंतर देखील पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे म्हणाले,‘‘वायसीएममधील प्रकाराबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई करू.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलBJPभाजपाPoliceपोलिस