नितीन काळजे यांचा महापौरपदाचा तर राहुल जाधव, शीतल शिंदे यांचा स्थायीसमिती सदस्यपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 17:00 IST2018-03-03T16:59:51+5:302018-03-03T17:00:10+5:30
पिंपरी -चिंचवड महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे.

नितीन काळजे यांचा महापौरपदाचा तर राहुल जाधव, शीतल शिंदे यांचा स्थायीसमिती सदस्यपदाचा राजीनामा
पिंपरी - पिंपरी -चिंचवड महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे. महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला तर राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
दरम्यान, " शहराच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर पदाचा राजीनामा देत आहे असे नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा देताना सांगितले. आज झालेल्या राजीनामा नाट्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.