महापौर पदी भाजपाकडून नितीन काळजे यांना उमेदवारी

By Admin | Updated: March 9, 2017 19:46 IST2017-03-09T19:46:47+5:302017-03-09T19:46:47+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची सत्ता आली आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी नितीन काळजे तर उपमहापौर पदासाठी शैलजा मोरे

Nitin Kalge ​​has been nominated as the mayor for the post of Mayor | महापौर पदी भाजपाकडून नितीन काळजे यांना उमेदवारी

महापौर पदी भाजपाकडून नितीन काळजे यांना उमेदवारी

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 9 - पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी भाजपाकडून महापौर पदासाठी नितीन काळजे तर उपमहापौर पदासाठी शैलजा मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काळजे आणि मोरे यांची निवड निश्चित मानले जात आहे.  महापौरपदाची निवडणूक 14 मार्चला होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. नितीन काळजे यांना भाजपाचा पहिला महापौर बनण्याचा मान मिळाला आहे. तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. नितीन काळजे हे दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहे. तर पहिलांदाच भाजपामधून नगरसेवक पदासाठी निवडुण आले आहेत. चऱ्होली प्रभागातून ते निवडणुक लढले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात आहे. तर पिंपरी महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून श्याम लांडे उपमहापौर पदासाठी निकिता कदम यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: Nitin Kalge ​​has been nominated as the mayor for the post of Mayor