शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मी आदेश पाळत नाही कारण मी उच्चशिक्षित अतिशहाणा..’यांसारखे फलक हातात देत निगडी पोलिसांची 'यादगार ' कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:56 IST

कोरोनाच्या महामारीत मार्निंग वॉक पडला महागात

ठळक मुद्देदहा जणांना हातात फलक देऊन केली शिक्षा

पिंपरी : 'मी गाढव आहे मला सांगितलेले कळत नाही, मी आदेश पाळत नाही कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे, मी अतिशहाणा असून मॉर्निंग वॉकला चाललो आहे, मी स्वार्थी आहे कारण मी कोरोना फैलावण्यास मदत करत आहे, मला मास्क वापरायची गरज नाही कारण मी देशद्रोही आहे..' यांसारखे फलक निगडी पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या हातात देऊन काहीवेळ रस्त्यावर उभे करत कायमस्वरुपी लक्षात राहील अशाप्रकारची अनोखी शिक्षा दिली. पोलिसांनी मार्निंग वॉक करणाऱ्या दहा जणांवर शुक्रवारी (दि. १७)  अशाप्रकारे कारवाई केली.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. त्यामुळे घरातच थांबण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. असे असतानाही या आवाहनाकडे दुर्लक्ष करून काही जण कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. सकाळी पोलीस अडवत नाहीत अथवा कोणी रोखणार नसल्याने पाय मोकळे करण्यासाठी अथवा कुत्रे फिरवण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. शहरातील विविध भागात असे प्रकार सर्रास दिसून येतात. अशा नागरिकांना पोलिसांकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पोलिसांची गस्त नसते, अशा रस्त्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे नागरिक घराबाहेर पडले. मात्र, त्याच वेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना रोखले. मॉर्निंग वॉकसाठी ते घराबाहेर पडल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, त्यातील काहीजण कुत्रा फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मास्क न वापरता काही जण घराबाहेर पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित आहे. मी अतिशहाणा आहे, मॉर्निंग वॉकला चाललो होतो, असे फलक त्यांच्या हातात देण्यात आले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस