शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांची वर्णी लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:59 IST

महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देगुरुवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

पिंपरी : कार्यकाल पूर्ण झाल्याने महापालिकेचे विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदी नाना काटे यांची वर्णी लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांद्वार समजते. यावर गुरुवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत दरवर्षी नवीन सदस्यांना विरोधीपक्षनेतेपदी संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने अवलंबिले होते. त्यानुसार पहिल्या वर्षी माजी महापौर योगेश बहल, त्यानंतर दुसºया वर्षी दत्ता साने यांना संधी दिली होती. साने यांचा एक वषार्चा कालखंड संपल्याने इच्छुकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साने यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार साने यांनी राजीनामा दिला आहे. या पदासाठी माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, नाना काटे, जावेद शेख, मयूर कलाटे यांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.विरोधीपक्षनेतेपदी भोसरी, पिंपरी विधानसभेला संधी दिली आहे. त्यामुळे चिंचवडला संधी मिळणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जाते. मावळ लोकसभेत अपयश आल्यानंतर पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपाला परखड विरोध करण्यासाठी चिंचवडमधील सदस्याला संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांना संधी मिळणार असल्याचे समजते. गुरुवारी अजित पवार शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी घोषणा होणार असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा