शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसनं पिंपरी चिंचवड मनपावर काढला 'जवाब दो मोर्चा', भाजपाविरोधात व्यक्त केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:37 IST

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापालिका जवाब दो' असा नारा देत मोर्चा काढला.

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापालिका जवाब दो' असा नारा देत मोर्चा काढला.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, युवा नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरात कच-याचे साम्राज्य आहे. नागरिकांना साधे मुबलक पाणीदेखील मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात स्वच्छतेबाबत राज्यात पहिले व देशात नवव्या क्रमांकावरअसलेले शहर भाजपाच्या काळात शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यांत निगडीपर्यंत नेणे गरजेचे असताना भाजपाचे पदाधिकारी त्यावर ठोस बोलत नाहीत. बीआरटीएसचे अनेक प्रकल्प रखडले आहेत,असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.  ''शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित आहे. रिंगरोड बाधित नागरिक भयभित आहेत. शहरात एकही मोठे विकासाचे काम सुरू नाही. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली’खाबूगिरी’ सुरु आहे. पारदर्शी काम, कधी लागणार भ्रष्टाचाराला लगाम,आश्वासने नको उत्तर हवे'', अशा बॅनरखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर ‘जवाब दो’ मोर्चा काढला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा