शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है ; राष्ट्रवादी काँग्रेसचं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 20:22 IST

भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी.

पिंपरी : महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेआंदोलन केले. ‘‘भाजपवाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय....’,  ‘ गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है... चोर है, भाजपवाले चौर है...अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन केले.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  महापालिकेवर मोर्चा काढला.  हातगाड्यावर टोपली ठेवली होती. त्यात नकली पैसे ठेवले होते. त्यावर ‘‘खाऊ गल्ली’ असा उल्लेख होता.  ‘धरा दाम पण करा काम’’ करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर आंदोलन महापालिका प्रवेशद्वारावर पोहोचले. 

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, राजू बनसोडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित लांडगे उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी.पिंपरी :   भाजपच्या मागणीनुसार स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या भाजपच्या दोन आमदारांची सर्वात अगोदर नार्को टेस्ट करावी. त्यामुळे भाजपने साडेचार वर्षात काय कारभार केला. यांचे सगळे पितळ उघडे पडेल, असे आव्हान राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भाजपला दिले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत आमच्या कोणत्याही स्थायीच्या सदस्याला चौकशीसाठी बोलावले नाही. जर चौकशीला बोलावले तर त्याला आमचे सदस्य सामोरे जातील. स्थायी समिती बरखास्त करण्याची आमची मागणी आहे. भाजपने त्यांच्या सदस्यांचे राजीनामे घ्यावेत. आम्ही आमच्या सदस्यांचे राजीनामे घेतो. स्थायी समितीत लाच प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचा एकही सदस्य बैठकीला हजर नव्हता. यापुढेही स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहणार नाहीत.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनBJPभाजपा