शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 13:16 IST

नवीन विरोधी पक्ष नेता कोण होणार, याबाबत पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू

ठळक मुद्दे राष्ट्रवादीमध्ये लॉबिंग : नाना काटे यांचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण

पिंपरी : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. विरोधी पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू आहेत. विद्यमान विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर यांच्या नावाची चर्चा आहे.

महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता असून विरोधी पक्षनेते पद दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक, शिवसेनेचे ९, मनसेचे एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी विरोधी पक्षनेतेपदी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर दुसºया वर्षी दत्ता साने यांना आणि तिसऱ्या वर्षी नाना काटे यांना संधी मिळाली होती. काटे यांचा कालावधी या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे. त्यामुळे नवीन विरोधी पक्ष नेता कोण होणार, याबाबत पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.भाजपाची सत्ता आल्यानंतर महापालिकेत राष्ट्रवादीने हल्लाबोल करणे अपेक्षित होते. मात्र, प्रखर विरोध होताना दिसत नाही. राष्ट्रवादीतही गट-तट आहेत. एक गट भोसरीच्या भाजपाच्या आमदारांच्या विरोधात बोलत नाही, तर दुसरा गट चिंचवडच्या आमदारांच्या विरोधात भूमिका घेत नाही. तर विरोधी पक्षातील काही नगरसेवक व भाजपा नेत्यांची ठेकेदारीमध्ये एकत्र भागीदारी आहे. त्यामुळे विरोध हा नावपुरताच दिसून येत आहे. दत्ता साने यांनी हल्लाबोल सुरू करतानाच त्याचा कालावधी संपला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटा-तटांचा फटका त्यांना बसला होता. आता चौथ्या वर्षांसाठी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले.........................विरोधी पक्षनेता बोलणारा हवानवीन विरोधी पक्षनेता हा अभ्यासू आणि बोलणारा असावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीकडून प्रखर विरोध होणे अपेक्षित होते. मात्र, तो काही प्रमाणात दत्ता साने यांचा अपवाद वगळता आजपर्यंत झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेता निवडताना जुन्या पदाधिका-यांना संधी द्यायची की युवा नगरसेवकांना द्यायची, याबाबत पक्षनेतृत्वाचा कस लागणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण